Friday, April 27, 2012

आला दिवस...गेला दिवस



आला दिवस.....गेला दिवस
अस्ताव्यस्त पसरल्या ढगांनी
संथ वाहून नेला दिवस...


दिवस होतो धूळच धूळ
दिवस वा-याच्या अंगातले खूळ
कधी दिवस होतो स्तब्ध पान
रिचवतो थंड शिडकाव्याची तहान


मंद आचेवर शिजवत ठेवल्यासारखा दिवस...


कधी आणतो कुठूनशी एक वावटळ
वावटळ म्हणजे असते वा-याच्या एका खोडीने
एकत्र आलेले धूळीचे चार कण..
या कणांचे कधीच नसते कसलेच काही म्हणणे
हवेबरोबर उंच उंच गोल गोल फिरत राहाणे


आला दिवस....गेला दिवस
दिशाहिन भटकत्या धुळीच्या कणांचा...


कधी दिवस झालाच पाऊस
तर धूळीचे कण होतात चिखल
तेव्हासुद्धा नसते त्यांचे कसलेच काही म्हणणे
पाय, चाक, पाणी...नेतील तिथे जाणे


आला दिवस....गेला दिवस
नेतो वाहून आपल्यासोबत असे असंख्य धूळीचे कण...

7 comments:

  1. मागे राहतात असंख्य खुणा, पावलांच्या, चाकांच्या,
    दिवस रात्र आणि ऋतु आल्या गेल्याच्या

    ReplyDelete
  2. मला आवडली कविता. जर ही पहिलीच असेल तर प्रयत्न नक्कीच चांगला आहे. मला जी गोष्ट विशेष आवडली ती म्हणजे मुक्त छंद आणि यमक यांचा चांगला मेळ जमून आलाय यात. दुसरं म्हणजे निरीक्षण शक्ति चांगली आहे तुझी. कल्पना नवीन आहे. ते महत्वाचं. शब्दांशी, त्यांच्या अर्थांशी खेळणं ज्याला म्हणतात ते आलंय या कवितेत. किप इट अप.

    ReplyDelete
  3. मस्त ... वेगळी कल्पना ... आवडली आवडली !
    काही सुचल ...


    कधी दिवस आणतो
    कुठून एक कवडसा
    कौलांच्या फटितुन
    डोकावतो तो थोडासा

    धुळीच्या कणान्ना देतो अस्तित्वाच्या जाणिवा
    उमगते तेंव्हा ... नसे इथे क्षणभर ही विसावा

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Parimal,
      What you have written, it is superb. I ever read long time. I think your experiences and observations are matured. I appreciate your content.

      Delete
  4. उमगते तेव्हा..नसे क्षणभर विसावा..आवडलं.

    तुही लिहितोस की काय? छान. :)

    ReplyDelete