Thursday, October 25, 2012

गार


पावसाचं पाणी अंगावर पडलं की कसं गार गार वाटतं.

उष्ण तळव्यावर उतरलेले थेंब पेरतात गारव्याला रंध्रारंध्रातून खोलवर. मनातही ती भिज उतरते आपोआप आणि मग उगाचच वाटत राहतं उत्फुल्ल...शांत...प्रसन्न वगैरे.

कुठल्याशा अज्ञात अवकाशातून आलेल्या त्या थेंबात एवढी ताकद असते!  

1 comment:

  1. कुठल्याशा अज्ञात अवकाशातून आलेल्या त्या थेंबात एवढी ताकद असते! (: भारी लिवलंय की...

    ReplyDelete